E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हमासचा प्रमुख इस्माईल हानिया इराणमध्ये हवाई हल्ल्यात ठार
Samruddhi Dhayagude
01 Aug 2024
बेरुत : हमासचा प्रमुख इस्माईल हानिया बुधवारी पहाटे हवाई हल्ल्यात मारला गेला. इराण आणि हमासने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. तसेच, या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दिली आहे. मात्र, इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) हानिया याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तेहरानमधील हानिया याच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाला. बुधवारी पहाटे हा हल्ला करण्यात आला.इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी समारंभास हानिया याने उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने इराणचे सर्वोच्च नेते सय्यद अली होसेनी खोमनी यांची भेट घेतली होती. त्यानंतर, काही तासांतच हा हल्ला झाला. ‘एस’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये खोमनी यांच्या कार्यालयाने म्हटले होते की, खोमनी यांनी पॅलेस्टिनी इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट हमासच्या राजकीय विभागाचे प्रमुख इस्माईल हानिया आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद चळवळीचे सरचिटणीस झियाद अल-नखलाह यांची भेट घेतली.
इस्लामिक गटांनी हानिया याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. इराणमधील वृत्तवाहिन्यांनी हानिया याच्या हत्येस इस्रायलला जबाबदार धरले आहे.
गेल्या वर्षी ७ जुलै रोजी हमासने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये १२२ नागरिक मारले गेले होते. तर, २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने हमासला संपविण्याचा विडा उचलला होता. तसेच, गाझा पट्टीवर हल्ला सुरु केला होता. एप्रिलच्या सुरुवातीला इस्रायलने हवाई हल्ल्यात हानिया याच्या तीन मुलांना ठार केले होते. या हल्ल्यात आमिर, हाजेम आणि महमद ठार झाले होते. इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) याबाबतची माहिती दिली होती.हमासच्या सर्वोच्च राजकीय नेत्याच्या नाट्यमय हत्येने हमास-इस्रायलमधील संघर्षाचा आणखी भडका उडू शकतो.
Related
Articles
आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारताचा जपानवर विजय
10 Sep 2024
बाबा कल्याणी यांना पुरस्कार
15 Sep 2024
अमेरिकन खुल्या स्पर्धेचा जॅनिक सिनर चॅम्पियन
10 Sep 2024
एकाच कादंबरीने जगविख्यात..!
15 Sep 2024
‘आप’चे २० उमेदवार जाहीर
10 Sep 2024
दाम्पत्याकडून विकसकाची १२ कोटींची फसवणूक
15 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)