E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
Samruddhi Dhayagude
01 Aug 2024
पुणे : मुळशीतील शेतकर्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणार्या व सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज गुरुवारी सुनावणी होणार आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह सातजणांविरोधात पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांनी शेतकर्याला पिस्तुलाचा धाक दाखवला होता. त्यामुळे त्यांच्यावर पौंड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा खेडकर यांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महाड परिसरातून अटक केली. दिलीप खेडकर यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, सध्या त्या येरवडा कारागृहात आहेत. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी झाली नाही. आता मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज गुरुवारी सुनावणी होणार आहे.
Related
Articles
फोगाट, पुनिया काँग्रेसची प्यादी
08 Sep 2024
प्राची यादव अंतिम फेरीत
08 Sep 2024
हाथरस अपघातातील मृतांचा आकडा १७ वर
08 Sep 2024
वडगावशेरीचे माजी आमदार हातात घेणार तुतारी
09 Sep 2024
भारतातील आरोग्य कर्मचार्यांना क्षयरोगाचा सर्वाधिक धोका
08 Sep 2024
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादी हल्ला उधळला
08 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)