स्वप्नील कुसाळे अंतिम फेरीत   

पॅरिस : मराठी पाऊल पडते पुढे कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळेने चांगली कामगिरी केली. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताचा आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला.खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुयातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. 

Related Articles