विविध देशांतील दूतावासांचे काम अफगाणिस्तानने रोखले   

तालिबान सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने अनेक देशांतील दूतावासांचे काम रोखले आहे. तेथील राजनैतिक अधिकार्‍यांना या पुढे काम करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारने त्यांना दिलेला पासपोर्टही रद्द केला आहे. त्यामुळे विविध देशांतील दूतावासांवर नियंत्रण मिळविण्याचा खटाटोप तालिबानकडून केला जात असल्याचे मानले जात आहे. 
 
या संदर्भातील माहिती अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एसवर पोस्ट टाकून दिली. लंडन, बर्लिन, बेल्जियम, बॉन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली, ग्रीस, पोलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, कॅनडा आणि नॉर्वे येथील दूतावास आणि तेथील राजनैतिक अधिकार्‍यांचा आमच्याशी काही एक संबंध नाही. त्यांची जबाबदारी घेणार नाही. तसेच या प्रकरणी पूर्वीच्या सरकारने दिलेली कागदपत्रे जसा पासपोर्ट, व्हिसा, करार आणि पाठिंबा आता अवैध ठरणार आहे. परदेशात राहणार्‍या अफगाणी नागरिकांना तालिबान इस्लामिक अमिरातच्या नेतृत्वाखालील दूतावासाने दिलेली कागदपत्रे वैध ठरतील. पूर्वीच्या सरकारने दिलेली अवैध ठरणार आहेत. 

Related Articles