व्हॉट्सऍप कट्टा   

दुकाने व आस्थापना नोंदणीनुसार
महाराष्ट्रातील ९३ टके दुकाने व 
आस्थापना, कारखाने नोंदणीनुसार महाराष्ट्रातील 
८२ टके कारखाने, लघु उद्योग 
नोंदणीनुसार महाराष्ट्रातील ९१ टके 
लघु उद्योग या सर्व ठिकाणी मराठी 
माणसांची संपूर्ण मालकी आहे. अथवा 
भागीदारी असेल तिथे ५० टयांहून 
अधिक मालकी आहे.
-----
श्रावण झूला
 
निघून चालल्या आषाढाच्या 
हिरमुसलेल्या सरी
मनात फुलते फुलपाखरू
झुला बांधला दारी...
खूप केले बेत तिने
किती, काय करायचं
सोडून सारं कामधाम
मनसोक्त झुलायचं...
गूजगोष्टी, गंमतगाणी
कुणी कुणी म्हणायची
फेर धरून सखीसवे
फुगडी कुठली घालायची?...
सणवार,देव सजले
मिष्टांन्नाने तृप्त झाले
पै- पाहुणे जमून सारे
कौतुकातच घर न्हाले...
खिडकीतून रोज तिला
खुणवत होता झोपाळा
सूर्य जातसे अस्ताला
मनी दाटे उमाळा...
म्हणता म्हणता श्रावण गेला   
आता स्वागत बाप्पाचे
खिडकीमधुनी धूसर दिसती
दोर श्रावण झूल्याचे ...
झुलणे फुलणे स्वप्नच सारे
श्रावण तसा सुनाच गेला
वाट पाहते पुन्हा नव्याने
आता बांधते मनात झूला
आता बांधते मनात झूला!
 
- शिल्पा चिटणीस , कोथरूड, पुणे
मो. ७५८८८६५०५३
 
मी आजपासून जुने सर्व विसरून नवे
आयुष्य सुरू करायचे ठरवले आहे.
पण ज्यांच्याकडून पैसे घेतलेत
ते ऐकायलाच तयार नाहीत!

Related Articles