माजी उपाध्यक्ष अल गोर यांचा हॅरिस यांना पाठिंबा   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर यांनी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.अल गोर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षीच्या निवडणुकीत अमेरिकेत आणि परदेशात लोकशाही मजबूत करण्यापासून ते हवामान बदलाविरोधातील लढाईला गती देण्यासाठी मला अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा देताना अभिमान वाटत आहे. 
 
वकील म्हणून कमला हॅरिस यांनी बड्या तेल कंपन्यांशी लढा दिला आणि जिंकला.  उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी इतिहासातील हवामान उपायांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक मंजूर करणार्‍या कायद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. व्हाइट हाऊसमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती गरज आहे. याआधी चार प्रमुख पर्यावरणवादी गटांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला होता.नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाकडून अद्याप त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

Related Articles