सोपोरमध्ये स्फोटात चार ठार   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात सोमवारी स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील शेर कॉलनीतील एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात हा स्फोट झाला. घटना घडली त्यावेळी काही जण मालमोटारीतून भंगार उतरवत होते. नजीर अहमद नाडरू (४०), अजीम अशरफ मीर (२०), आदिल रशीद भट (२३) आणि मोहम्मद अझहर (२५) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण शेर कॉलनीतील रहिवासी होते. 

Related Articles