E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपी कर्मचार्यांचा संप; प्रवाशांची गैरसोय
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
पुणे : पीएमपी कर्मचार्यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून संप सुरू केला आहे. या संपाला शिवसेना पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, सहा वर्षांपासून सेवेत असणार्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचार्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा काही मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या.
या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांना बसला.पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील किमान बारा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असून चर्चेला सुरूवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Related
Articles
शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला
11 Sep 2024
डॉ. रोहित टिळक यांनी पोहचविला सर्वसामान्यांपर्यंत मोदकांचा प्रसाद
14 Sep 2024
दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन
09 Sep 2024
सेमिकंडटरच्या उत्पादनासह पुरवठा साखळीची गरज : मोदी
12 Sep 2024
'इराणचा उपग्रह झेपावला
15 Sep 2024
अयोध्येत बलात्कार; पाच जणांना अटक
15 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)