E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शूटिंगमध्ये रमिता जिंदालचे स्वप्न भंगले
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये सोमवारी तिसर्या दिवशी भारताच्या रमिता जिंदालने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या पदकाच्या लढतीत रमिताच्या पदरी निराशा आली आहे. रमिता ८ जणांच्या इव्हेंटमध्ये ७ व्या स्थानी राहिली. तिने एकूण १४५.३ गुण मिळवले.
पात्रता फेरीत २० वर्षीय रमिता पाचव्या स्थानावर राहिली होती. रमिताने पात्रता फेरीत ६० शॉट्समध्ये ६३१.५ गुण मिळवले होते. रमिताने पहिल्या सिरीजमध्ये १०४.३, दुसर्यामध्ये १०६.०, तिसर्यामध्ये १०४.९, चौथ्यामध्ये १०५.३, पाचव्यामध्ये १०५.३ आणि सहाव्या सिरीजमध्ये १०५.७ गुण मिळवले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारताची एलावेलिन वॅलारिव्हनही सहभागी झाली होती, परंतु ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. वालारिवन ६३०.७ गुणांसह १० व्या स्थानावर राहिली.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे टॅस सल्लागार आहेत. २०१६ मध्ये रमिताला तिचे वडील शूटिंग रेंजमध्ये घेऊन गेले होते. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. २० वर्षीय रमितानं २०२२ मध्ये ज्युनियर आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होेते. त्यानंतर तिने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदके जिंकली.
Related
Articles
आनंदोत्सवाला सुरुवात
08 Sep 2024
पाकिस्तानात पुन्हा पोलिओ लशीकरण कर्मचार्यांवर गोळीबार
13 Sep 2024
मेलबर्नमधील गणपती महोत्सवाचे डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते उद्घाटन
10 Sep 2024
आंदोलक डॉक्टरांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र
14 Sep 2024
कोळसा विक्रीतून सरकार मालामाल
11 Sep 2024
व्हिएतनाममधील चक्रीवादळात ५९ नागरिकांचा मृत्यू
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन