सूर्या-गंभीर पर्वात भारताचा पहिला मालिका विजय   

पालेकल : भारताने श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार ७ गडी राखून विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे. त्यामुळे गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीची संस्मरणीय सुरुवात झाली आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आज (मंगळवारी) या दोन्ही संघात तिसरा सामना रंगणार आहे. 
 
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २० षटकात ९ विकेट गमावत १६१ धावा केल्या. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला विजयासाठी ८ षटकांत ७८ धावांचे लक्ष्य मिळाले. जे भारतीय संघाने ६.३ षटकात ३ विकेट्स गमावत ८१ धावा केल्या. भारताने आतापर्यंत खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंची रणनीती आणि कौशल्य यात आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. ते कोणत्याही वेळी दडपणाखाली दिसले नाहीत. 

लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न

नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसर्‍या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला हलयात न घेता लीन स्वीप देण्याच्या उद्देशाने मंगळवारी येथे मैदानात उतरेल. श्रीलंकेसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी. दुसरीकडे, भारताने आतापर्यंत विश्वविजेत्यासारखी कामगिरी केली आहे.

Related Articles