E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलमध्ये फुटबॉल मैदानावर क्षेपणास्त्र हल्ला; १२ ठार
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
तेल अवीव : इस्रायल-नियंत्रित गोलान हाइट्समधील फुटबॉल मैदानावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच लहान मुलांसह १२ जण ठार झाले. तर २० जण जखमी झाले आहेत. दक्षिण लेबनॉनमधील चेबा गावाच्या उत्तरेकडील भागातून क्षेपणास्त्र डागण्यात आले.इस्रायल आणि लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्लाह यांच्यात लढाई सुरू झाल्यापासून इस्रायलच्या उत्तर सीमेवरील हा हल्ला सर्वात प्राणघातक हल्ला आहे. या हल्ल्यामुळे या प्रदेशात व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. इस्रायलने या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहला जबाबदार धरले आहे, मात्र, या हल्ल़्याची जबाबदारी हिजबुल्लाहने स्वीकारण्यास नकार दिला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला आहे की, हिजबुल्लाला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
इस्रायली लष्कराचे प्रमुख प्रवक्ते रिअर डमिरल डॅनियल हगारी यांनी ७ ऑटोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवरील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे म्हटले आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, यात शंका नाही. पंतप्रधान नेत्यान्याह अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत. इस्रायलमध्ये आल्यानंतर सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. इस्रायलच्या लष्कराने शनिवारी काफर किला या सीमावर्ती गावात हिजबुल्लाह शस्त्रास्त्रांच्या डेपोला लक्ष्य केले होेते. त्यात हिजबुल्लाहचे तीन दहशतवादी मारले गेले होते.
Related
Articles
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या ४१ नागरिकांचा मृत्यू
04 Sep 2024
गुजरात गॅस : ‘ऊर्जा’ देणारी कंपनी
09 Sep 2024
बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
10 Sep 2024
पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
08 Sep 2024
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग कन्या रत्न
08 Sep 2024
धावपटू रेबेकाचे निधन
06 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)