E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मनू भाकरला कांस्यपदक
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने उघडले खाते
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक -२०२४ स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये रविवारी कांस्यपदक पटकावले आहे. भारताला स्पर्धेत मिळालेले हे पहिले पदक ठरले आहे. काल दुपारी झालेल्या अंतिम फेरीत तिने पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. याबद्दल तिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडापटूंकडून तिचे कौतुक केले.
स्पर्धेत कोरियन नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले आहे. मनू भाकर सुरुवातीला दुसर्या क्रमांकावर होती. कोरियाची खेळाडू अव्वल क्रमांकावर होती. मग मनूची तिसर्या क्रमांकावर घसरण झाली. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन नेमबाजांनी वर्चस्व कायम ठेवत पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. नेमबाजीत पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
दरम्यान, भारताच्या मनू भाकरने शनिवारी चमक दाखवून १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसर्या स्थानी राहिली. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५ व्या स्थानी राहिली. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्यामुळे भारताच्या रिदिमाचे आव्हान शनिवारीच संपुष्टात आले होते. अंतिम फेरीमध्ये अखेरच्या क्षणी मनू दुसर्या स्थानी आल्याने भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त रौप्य की कांस्य याची देशवासियांना प्रतीक्षा होती. अखेर मनूने कांस्यपदकावर मोहोर उमटवली.
मून भाकर २२ वर्षांची असून ती मूळची हरियानातील झज्जर तालुयातील आहे. तिने नेमबाजीत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरने दोन सांघिक पदके पटकावली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात तिने नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदके मिळविली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावलेले आहे. २०२२ मध्ये तिला आशियाई स्पर्धेचे एक सांघिक सुवर्णपदक मिळाले होते.
गीतेपासून प्रेरणा
कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर केंद्रीत करण्यास सांगितले होते. तेच अंतिम स्पर्धेमध्ये माझ्या डोयात सुरू होते, असे मनूनेे कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितले. ती म्हणाली, कांस्यपदक जिंकल्याचा आनंद मला झाला. यासाठी खूप मेहनत घेतली होती. देशासाठी पदक जिंकू शकले, याचा मला सर्वाधिक आनंद झाला आहे. हे पदक सर्वांचे आहे. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार कसे मानू ते कळत नाही. गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन पदक जिंकण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तिचे पदक हुकले होते. ती उणीव आता कांस्यपदक पटकावून तिने भरून काढली आहे.
अंतिम फेरीमधील मनू भाकरचे गुण
पहिली ५ शॉट सीरीज : १०.६, १०.२, ९.५, १०.५, ९.६, एकूण ५०.४
दुसरी ५ शॉट मालिका : १०.१, १०.३, ९.६, ९.६, १०.३, एकूण: ४९.९
उर्वरित शॉट्स : १०.५, १०.४, ९.८, ९.८, ९.९, १०.२, १०.१, १०.२, १०.१, १०.०, १०.१,१०.३
मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव
पॅरीस : ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताने आज पहिले पदक जिंकले आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकर ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी देशातील पहिली महिला नेमबाज ठरली आहे. मनू भाकरच्या या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत मनू भाकरचे अभिनंदन केले आहे.
१० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यापश मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन...मनू भाकर नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. भारताला तुझ्यावर अभिमान आहे, असं द्रौपदी मुर्मु म्हणाल्या.
एक ऐतिहासिक पदक मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणार्या मनूचे खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचे हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन...असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.मनू भाकरने शनिवारीच महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता मिळवली होती. आज पदक स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये मनू भाकर सुरुवातीपासूनच टॉप ३ मध्ये होती. या स्पर्धेदरम्यान मनू भाकेरनेही अव्वल स्थान गाठले होते, पण शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचेपर्यंत ती दोन्ही कोरियन नेमबाजांपेक्षा मागे पडली आणि तिसर्या क्रमांकावर राहिली. मनू शेवटपर्यंत रौप्य पदकाच्या लढतीत होती. मनू भाकरचे रौप्य पदकाचे लक्ष्य ०.१ ने हुकले. मला खूप छान वाटतंय. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कांस्य पदक जिंकले असले तरी मला आनंद आहे की मी देशासाठी जिंकू शकले.हे पदक सर्वांचे आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोयात सुरू होतं. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार असं मनू भाकर म्हणाली. कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, तिने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मनू भाकर २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.
Related
Articles
अर्थगती मंदावली
15 Sep 2024
कोमोरोस बेट समूहाच्या अध्यक्षांवर चाकू हल्ला
15 Sep 2024
अजान आणि नमाजच्या वेळी हिंदूंना पूजा करता येणार नाही
13 Sep 2024
पर्यटकांसाठी ’काझीरंगा‘ १ ऑटोबरपासून खुले
09 Sep 2024
गुलजार यांच्या गीतांनी रसिक भारावले
11 Sep 2024
लष्करी अधिकार्यासह मैत्रिणींना मारहाण
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)