E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
श्रीलंकेच्या महिलांनी जिंकला आशिया चषक
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
डंबुला : महिला आशिया चषक २०२४ च्या स्पर्धेत श्रीलंकेने बाजी मारली आहे. भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ८ बळीनेे विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचे आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अटापट्टूने ४३ चेंडूत ६१ धावा केल्या. तर हर्शिश्था समरविक्रमाने ५१ चेंडूत ६९ धावा केल्या. या खेळीत तिने ६ चौकार आणि २ षटकार टोलावले. भारताने गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली भागिदारी करत विजयाचा मार्ग सुकर केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने २० षटकांत ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने ४७ चेंडूत सर्वाधिक ६० धावा केल्या. तिने या खेळीत १० चौकार मारले. याशिवाय उमा छेत्री, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. जेमिमाह रॉड्रिग्जनंतर रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने १६ चेंडूत २९ धावा केल्या. तर रिचा घोषने १४ चेंडूत ३० धावा केल्या. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. याशिवाय उदेशिका प्रबोधनी, सचिन निशांक आणि चमारी अट्टापथू यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
टीम इंडियाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने साखळी फेरीत तीन सामने खेळले आणि तिनही सामने जिंकले. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट्सने, यूएईचा ७८ धावांनी तर तिसर्या सामन्यात नेपाळचा ८२ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशाचा १० बळीने पराभव करत फायनलमध्ये स्थान पक्के केले.श्रीलंकेनेही साखळी टप्प्यातील तिनही सामने जिंकले. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ७ बळीनेे, दुसर्या सामन्यात मलेशियाचा १४४ धावांनी तर तिसर्या सामन्यात थायलंडचा १० विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ३ बळी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Related
Articles
तर राज्याचा दर्जा पुन्हा देऊ : काँग्रेस
05 Sep 2024
प्लास्टिक कचरा निर्मितीत भारत जगात आघाडीवर
06 Sep 2024
नायजेरियात बोको हरामकडून १०० हून अधिक जणांची हत्या
06 Sep 2024
गणेशोत्सव काळात पीएमपीच्या ६६ मार्गात बदल
06 Sep 2024
गाझावरील हवाई हल्ल्यात १२ पॅलेस्टिनींचा मृत्यू
08 Sep 2024
राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णसंख्येत वाढ
05 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)