रमिता जिंदालचा अंतिम फेरीत प्रवेश   

पॅरिस : १० मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचला आहे.  रमितान जिंदालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेक ठरली आहे. २० वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६३१.५ गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत १०० पेक्षा जास्त गुण मिळवले.सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंह चीमा पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल नाहीत. सरबज्योत पात्रता फेरीत ५७७ गुणांसह नवव्या स्थानावर, तर अर्जुन ५७४ गुणांसह १८ व्या क्रमांकावर राहिला.

Related Articles