अर्शदीप सिंगने टिपले महत्त्वपूर्ण बळी   

पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत १६१ धावा करत ९ फलंदाज बाद केले. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीनंतर पावसाने सामना खोळंबला. श्रीलंकेकडून खेळताना पाथमू निसंका याने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. तर कुशल मेंडीस याने १० धावा करत तंबूत परतला. भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग याने त्याला बाद केले. तर कुशल परेरा ५३ धावा करत शानदार अर्धशतक साकारले. कामिनडू मेंडीस याने २६ धावा केल्या. असलंका याने १४ धावा केल्या. महेश तिक्षणा हा २ धावांवर बाद झाला. पाथिराणा याने १ धाव घेतली. भारतीय गोलंदाज रवी भिष्णोई याने ३क्क् बळी टिपले. असर पटेल याने २ बळी, अर्शदीप सिंग याने २ बळी बाद केले. हार्दीक पांड्याने देखील २ गडी बाद केले. 
 
 टीम इंडियाने संघात एक बदल केला असून शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलला सराव करताना दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली.  तर श्रीलंकाचा संघ देखील एक बदलासह मैदानात उतरला आहे. भारतीय संघाने मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे दुसर्‍या सामन्यातही भारतासाठी विजय सोपा असणार नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या टी-२० सामन्यात दमदार सुरुवात केली होती. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले होते. 

Related Articles