E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
पाकिस्तानात आटा आठशे रुपये किलो
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
वृत्तवेध
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. देशाची अर्थव्यवस्था चीनच्या कर्जाखाली दबली जात आहे. सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे बेलआउट पॅकेजची मागणी करावी लागेल; मात्र जागतिक नाणेनिधीच्या अटी एवढ्या जाचक आहेत, की सरकारला त्या मान्य करणे कठीण जात आहे. दुसरीकडे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशात आटा (पीठ) ८०० पाकिस्तानी रुपये प्रति किलो, तर तेल ९०० पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाले आहे.
पाकिस्तानी जनतेला एका रोटीसाठी जवळपास २५ रुपये खर्च करावे लागतात. आवश्यक बाबी सर्वसामान्यांच्या आवायाबाहेर जात आहेत. पाकिस्तानमध्ये राहणीमानाचा खर्च गगनाला भिडू लागला आहे. लोक त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाहीत. पाकिस्तानी रुपयाचे मूल्यही कमालीचे घसरत आहे. अन्नाबरोबरच घर, आरोग्यसेवा आणि चांगले शिक्षणही सर्वसामान्यांच्या आवायाबाहेर जात आहे.
दुसरीकडे, जागतिक नाणेनधीकडून सबसिडी बंद करण्याचा दबाव वाढत आहे. असे असतानाही पाकिस्तानने संरक्षण खर्चात १५ टक्के वाढ केली आहे. पाकिस्तानी लष्कराला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २,१२२ अब्ज रुपये देण्यात आले आहेत. हा निर्णय पाहून झुल्फिकार अली भुट्टो यांचे एक चर्चीत विधान आठवते. ते म्हणाले होते, की आमचे लोक जेवणाऐवजी घास खातील पण, आम्ही अणुबॉम्ब बनवू!
पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या मते देशाचा विकासदर (जीडीपी) ३.६ टक्के वेगाने वाढेल. मागील आर्थिक वर्षातील ३.५ टयांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे; मात्र पाकिस्तानचा आर्थिक विकास दर केवळ २.३८ टयांवर जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानचे एकूण अंदाजपत्रक १८,८७७ अब्ज रुपये आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्राचा वाटा दुसर्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बहुतांश पैसा कर्ज फेडण्यासाठी जाणार आहे. मित्र चीनने पसरवलेल्या कर्जाच्या सापळ्यात पाकिस्तान चांगलाच अडकला आहे. परिस्थिती अशी आहे, की पाकिस्तानच्या अंदाजपत्रकातील सर्वात मोठा खर्च कर्ज परतफेडीकडे जात आहे. आता तर कर्ज परतफेडीसाठी पाकिस्तानला अंदाजे ९७०० अब्ज रुपये खर्च करावे लागतील. देशातील करसंकलन १२,९७० अब्ज रुपये असल्याचा अंदाज आहे. मोहम्मद औरंगजेब यांच्या मते, देश आर्थिक संकटातून बाहेर येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरणही जाहीर केले आहे.
Related
Articles
उत्तर कोरियाच्या ३० अधिकाऱ्यांना फाशी
04 Sep 2024
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
08 Sep 2024
अजित पवारांची बैठकीकडे पाठ; मात्र विमानतळावर शहांची भेट
10 Sep 2024
...तर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता
05 Sep 2024
रशिया-युक्रेन युद्ध भारत थांबवू शकतो : मेलोनी
09 Sep 2024
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोदकांची एक कोटीची उलाढाल
08 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)