E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
३५ हजार कोटींची तरतूद
Samruddhi Dhayagude
28 Jul 2024
अर्थ खात्याचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित
मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षांत ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य व सक्षमीकरणासाठी त्यांचा मान, सन्मान आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. या योजनेला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी राज्याचे अतिरिक्त अंदाजपत्रक सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेनुसार पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी वर्षाला अंदाजे ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खर्चाचा हा बोजा सरकारी तिजोरीला सहन करणे शय नसल्याने अर्थ विभागाचा या योजनेला विरोध असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांचा अजित पवार यांनी काल स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, तसेच राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अंदाजपत्रकात सादर केली आहे. अर्थ आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली. चालू आर्थिक वर्षांत योजनेसाठी आवश्यक अशा संपूर्ण रकमेची तरतूदही अंदाजपत्रकात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शय आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
Related
Articles
कोळसा विक्रीतून सरकार मालामाल
11 Sep 2024
माथेफिरूकडून पत्रकारावर हल्ला
14 Sep 2024
पेठांतील वैविध्यपूर्ण देखावे पाहण्यासाठी गर्दी
15 Sep 2024
दाम्पत्याकडून विकसकाची १२ कोटींची फसवणूक
15 Sep 2024
केजरीवाल तुरुंगाबाहेर
14 Sep 2024
सचिन खिलारीसाठी रुपेरी क्षण.....
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)