E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सातार्यात डेंग्यूचा पहिला बळी
Samruddhi Dhayagude
28 Jul 2024
सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील वाई शहरात डेंग्यूचा पहिला बळी गेल्याने वाई नगरपालिका प्रशासनाचा डोळेझाकपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
वाई नगरपालिकेला शहरासाठी स्वतःचे आरोग्य केंद्र उभारता आले नाही. यात्रा निवासमधील यात्रेकरूंच्या खोल्या बंद करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा गुपचूप प्रयत्न करण्यात आला खरा, पण त्यावर टाकलेला निधी हा कृष्णामाईच्या पात्रात कधी वाहून गेला हे एकाही वाईकराला आजपर्यंत समजलेले नाही.
नगरपालिका प्रशासनाकडे स्वतंत्र आरोग्य अधिकारी नाही. आरोग्य विभागाचा कारभार कर्मचार्यांच्या अंगावर सोपवून अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून चौकशीसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे मार्गी लावत आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाने नेमकी काय उपाय योजना केली ती किती अमलात आणली, फॉगिंग किती केले, हे कोणी पाहत नाही. नगरपालिकेच्या तकलादू कारभाराने डेंग्यूच्या डासांनी वाईकरांचे जगणे मुश्किल केले आहे. सरकारी व खासगी दवाखाने डेंग्यूच्या रुग्णांनी भरले आहे, हे वास्तव माहीत असूनही प्रशासन फॉगिंग ठेकेदाराचे लाड पुरवण्यात मशगुल आहे. दोन महिन्यापासून डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.
Related
Articles
भारतीय संघ चेन्नईत दाखल
14 Sep 2024
हिमनदी वितळल्याने भूकंपाचे धक्के !
14 Sep 2024
माजी गृहमंत्री देशमुखांसह पाचजणांवर सीबीआयकडून गुन्हा
09 Sep 2024
वाचक लिहितात
11 Sep 2024
मोदी यांची भीती उरली नाही : राहुल
11 Sep 2024
व्हिएतनाममधील चक्रीवादळात ५९ नागरिकांचा मृत्यू
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन