E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक
Samruddhi Dhayagude
28 Jul 2024
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात सुर्यकुमार यादव याने शानदार अर्धशतक केले. त्याआधी यशस्वी जैस्वाल , शुभमन गिलने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने ७४ धावांची सलामीची भागिदारी केली. यानंतर सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक झळकावत भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला. भारताच्या टी २० संघाचा नियमित कर्णधार म्हणून नेतृत्त्व करत असताना पहिल्याच सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने ५८ धावा केल्या. रिषभ पंतनं देखील ४९ धावा करत संघाला २०० धावांचा टप्पा पार करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतानं २० षटकामध्ये ७ बळीवर २१३ धावा केल्या. श्रीलंकेपुढे विजयासाठी २१४ धावांचे आव्हान भारतीय संघाने ठेवले आहे.
सलामीवीर बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवनं ५८ धावांची वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवचं कॅप्टन म्हणून हे तिसरं अर्धशतक ठरलं. सूर्यानं आतापर्यंत टी २० मध्ये २० अर्धशतकं केली आहेत. सूर्यकुमार यादवनं ८ चौकार आणि ४ षटकार मारले. सूर्यानं २६ बॉलमध्ये ५८ धावांची खेळी केली. त्यापूर्वी श्रीलंकेच्या खेळाडूंकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा सूर्यकुमार यादवनं करुन घेतला. हार्दिक पांड्या मोठी खेळ करण्यात अपयशी ठरला त्याला पथिरानानं बाद केलं.
भारताला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं आक्रमक सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वालनं ४० आणि शुभमन गिलनं ३४ धावा केल्या. दोघांच्या खेळीमध्ये सर्वाधिक धावा या चौकार आणि षटकारांच्या होत्या. दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं पॉवरप्लेमध्ये ७४ धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं दोन षटकार मारले, तर शुभमन गिलनं एक षटकार मारला.सूर्यकुमार यादवनं २ षटकार मारले. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या फलंदाजांनी तो चुकीचा ठरवला. यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेलं खराब क्षेत्ररक्षण देखील कारणीभूत ठरलं. सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतचा कॅच श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी सोडला. हे खराब क्षेत्ररक्षण श्रीलंकेला महागात पडलं.
श्रीलंकेचा वेवगान गोलंदाज मथिशा पथिरानानं भारताच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यानं सूर्यकुमार यादवला ५८ धावांवर आणि हार्दिक पांड्याला ९ धावांवर बाद करत भारताच्या आक्रमक फलंदाजीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.पथिरानानं रियान परागच्या रुपात भारताला तिसरा धक्का दिला. पथिरानानं रिषभ पंतला ४९ धावांवर बाद करुन श्रीलंकेला आणखी एक यश मिळवून दिले भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर रचला.
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ :चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा,दिलशान मदूशंका
Related
Articles
आंदोलक डॉक्टरांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र
14 Sep 2024
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती
11 Sep 2024
अनिवासी भारतीय पतीकडून महिलेचा छळ
08 Sep 2024
भारत-चीनमध्ये नागरी विमान वाहतूक सहकार्यावर चर्चा
13 Sep 2024
वाचक लिहितात
13 Sep 2024
भारतीय हॉकी संघाचा चीनवर विजय
09 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)