दिल्लीत एक हजार पक्ष्यांची सुटका   

पोपट, कोकिळेसह दुर्मिळ जातींचा समावेश

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील कबुतर बाजारात एका ठिकाणी डांबून ठेवलेल्या एक हजार पक्ष्यांची सुटका वन विभाग आणि पोलिसांनी शुक्रवारी केली. त्यामध्ये पोपटासह दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. 
 
वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संवर्धन करणार्‍या  पेटा संस्थेने सांगितले की, एक हजार पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये पोपट आणि कोकीळसह अन्य पक्ष्यांचा समावेश आहे. दोन दुकानात या पक्ष्यांना पिंजर्‍यात कोंबून ठेवले होते. वन्य पशू आणि पक्ष्यांसाठी कार्यरत माजी खासदार मेनका गांधी यांनी पक्ष्यांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला होता. जामा मशीद ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वन आणि पोलिस विभागाने संयुत कारवाई दुकानांवर केली. या प्रकरणी दुकानमालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व पक्ष्यांच्या सुटकेनंतर त्यांना तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रात हलवले असून त्यांची आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे. 

Related Articles