क्रेग ब्रेथवेटचे अर्धशतक   

बर्मिंगहॅम : विंडीजविरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम फलंदाजी करताना विंडीजच्या संघाने ५२.२ षटकांत १९२ धावा केल्या. यावेळी ५ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. या सामन्यात क्रेग ब्रेथवेट याने सलामीला येताच शानदार अर्धशतक केले. त्याने ८६ चेंडूत ६१ धावा केल्या. यावेळी ८ चौकार लगावले. 
 
त्यानंतर लुइस याने ६१ चेंडूत २६ धावा करत तो गुस अ‍ॅटकिनसनच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथकडे झेलबाद झाला. क्रिग मॅकेन्झे याने १२ धावा केल्या. त्याने यावेळी ३ चौकार लगावले. त्याचा त्रिफळा मार्क वूड याने उडविला. तर अ‍ॅलिक अ‍ॅथन्जे याने २ धावा केल्या. त्याचा गुस अ‍ॅटकिंनसन याने त्रिफळाचित केले. 
 
काविम होडगे याला १३ धावांवर ख्रिस वोस याने त्रिफळाचित केले. जेसन होल्डर याने ७३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. तर त्याला साथ देताना जोसुव्हा डी सिल्व्हा याने नाबाद ३५ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी ख्रिस वोस याने १ बळी घेतला. तर गुस अ‍ॅटकिंन्सन याने २ बळी टिपले. मार्क वूड हा २ बळी घेण्यात यशस्वी ठरला. 

Related Articles