जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसची समिती   

मुंबई,  (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  महाविकास आघाडीच्या अंतर्गत  जागावाटपाची  चर्चा  करण्यासाठी काँग्रेसने राज्य पातळीवरील नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीत प्रदेश काँग्रेसच्या सात तर मुंबई काँग्रेसच्या तीन अशा दहा  १० सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसने  शुक्रवारी नवी दिल्लीतून या समितीची घोषणा  केली.
 
प्रदेश  समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबईतील समितीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लमशेख यांना स्थान देण्यात आले आहे. ही समिती राज्य पातळीवरील  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी  विधानसभा मतदारसंघाच्या जागावाटपाविषयी वाटाघाटी करेल.  लोकसभा निवडणुकीच्यावेळी शेवटपर्यंत जागावाटपाचा घोळ सुरू होता. 

Related Articles