E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोणावळ्यात २४ तासांत तब्बल ३७० मिलिमीटर पावसाची नोंद
Samruddhi Dhayagude
26 Jul 2024
लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरले
लोणावळा (वार्ताहर): लोणावळा शहरात गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासांत तब्बल ३७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील भुशी धरण आणि टाटा कंपनीचे लोणावळा धरण १०० टयांपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे धरणाच्या द्वार विरहित सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये होऊ लागला आहे. पावसाचा जोर वाढला, तर काही वेळातच शहरातील हुडको परिसर आणि भांगरवाडी, तसेच बाजार पेठेच्या भागात पूरपरिस्थिती तयार होण्याची शयता निर्माण झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ४ दिवसात लोणावळा शहरात एकूण ९४९ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. सततच्या कोसळणार्या या पावसामुळे लोणावळा धरण भरण्याची आणि शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शयता निर्माण झाल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासन बुधवार पासूनच हाय अलर्ट मोडवर होते. तेव्हापासूनच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत होता. धरण पूर्ण भरताच प्रशासनाने हुडको परिसर आणि भांगरवाडी, तसेच बाजार पेठेच्या काही भागातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास तातडीने तसा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले गेले आहे. यासाठी नागरिकांनी त्यांना आवश्यक असलेले महत्त्वाचे सामान एकत्र करून ठेववाव्या अशाही सूचना दिल्या गेल्या आहे.
पडत असलेला मुसळधार पाऊस आणि पुढील दोन दिवस देण्यात आलेल्या जोरदार पावसाचा इशारा यामुळे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी मावळ तालुयातील भुशी धरणासह अन्य पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याचे आदेश काढले आहे. इकडे लोणावळा नगरपरिषदेणने कधीही उद्भवू शकणार्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आपली स्वतःची रेस्यू टीम तयार ठेवली असून स्थानिक शिवदुर्ग मित्र, आयएनएस शिवाजी आणि डेला अॅडव्हेंचर यांचे बचाव पथक देखील आवश्यक सामग्री आणि बोटीसह तयारीत उभे आहे.
राजमाची किल्ल्याकडे जाणार्या मार्गावर दरड, तर लोहगड किल्ल्याच्या मार्गाला भेगा
लोणावळा शहरातून राजमाची किल्ल्याकडे जाणार्या मार्गावर एक दरड खाली आली असून हा मार्ग बंद झाला आहे. डेला रिसॉर्टच्या वतीनं याठिकाणी जेसीबी आणि इतर मशिनरी पाठवून हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मुळातच कच्च्या रस्त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करणारे राजमाचीकर ग्रामस्थ आणि येथे येणारे पर्यटक या दरड कोसळण्याच्या घटनेने अधिकच त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे लोणावळा शहरातून दुधीवरे खिंडी जवळून लोहगड किल्ल्याकडे जाणार्या रस्त्याला मुसळधार पावसामुळे मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्ता दोन ठिकाणी खचला आहे. लोहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरण्याची शयता असल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
14 Sep 2024
उत्तर प्रदेशात चिमुकल्यावर लांडग्याचा पुन्हा हल्ला
08 Sep 2024
सेमिकंडटरच्या उत्पादनासह पुरवठा साखळीची गरज : मोदी
12 Sep 2024
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक पदके
09 Sep 2024
शेअर बाजारात उसळी
13 Sep 2024
अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी समज द्यावी
09 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन