भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुयातील पश्चिम आदिवासी भागात सततच्या पावसामुळे भात खाचरांची बांधबंधीस्ती तुटली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर दरडी कोसळल्या आहेत. जीवितहानी झालेली नसली तरी शेतीचे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. आसाणे कुंभेवाडी रस्त्यावर दरड कोसळली असून, तीन गावांचा संपुर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावरील दरडी काढण्याचे काम सुरू असून संध्याकाळ पर्यंत रस्ता सुरू होईल असे सांगण्यात आले. तळेघर पाटण कुशिरे कोंढरे या रस्त्यावर देखील दरडी व झाडे पडली असून भीमाशंकर व आहुपे खोर्याला जोडणारा हा रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता सुरू करण्यासाठी वेळ लागणार असून दरडी काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नविन माळीण गावठाणात पावसामुळे भिंत पडली असूनहि पुन्हा नव्याने बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या. आमडे येथे पाराबाई अंकुश यांच्या घराची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून विवेक वळसे पाटील यांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या सर्व नुकसानीची पहाणी तहसीलदार संजय नागटिळक, विवेक वळसे पाटील, प्रकाश घोलप, अमोल अंकुश, सोमनाथ काळे यांनी केली.
Fans
Followers