बिभव कुमार यांची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव   

मालिवाल मारहाण प्रकरण

नवी दिल्ली : स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणात जामिनासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने १२ जुलै रोजी बिभव कुमार यांना जामीन नाकारला होता. त्यास कुमार यांनी आव्हान दिले असून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. 
 
१३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली होती. तर, १८ मे रोजी कुमार यांना अटक झाली होती. त्यानंतर, न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. २४ मे रोजी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर पुन्हा तीन दिवसांसाठी त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर टप्प्या-टप्प्यात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. १६ मे रोजी कुमार यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. यामध्ये धमकी, प्राणघातक हल्ला आदींचा समावेश होता. 

Related Articles