कमला हॅरिस नेतृत्व करण्यास अपात्र : ट्रम्प   

वॉशिंग्टन : कमला हॅरिस देशाचे नेतृत्व करण्यास अपात्र आहेत, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.  
 
एक प्रचार सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले, कमला हॅरिस या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात उदारमतवादी राजकारणी आहेत. जर त्या सत्तेत आल्या तर या देशाला वेगाने उदध्वस्त करतील. जो बायडेन यांच्या मानसिक अक्षमतेबद्दल   त्या खोटे बोलत असतील तर त्या तुमच्याशी कोणत्याही गोष्टीबद्दल खोटे बोलू शकतात. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही. बायडेन यांच्याप्रमाणेच कमला हॅरिस नेतृत्व करण्यास अपात्र आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकन जनता त्यांना म्हणेल, तुम्ही अतिशय खराब कामगिरी केली आहे. तुम्ही अतिउदारमतवादी आहात. आम्हाला तुम्ही राजकारणात नको आहात.

Related Articles