E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीता अंबानी ’आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या सदस्यपदी
Samruddhi Dhayagude
26 Jul 2024
पॅरिस : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पुन्हा एकदा नीता अंबानींवर विश्वास व्यक्त केला आहे. आयओसीच्या सदस्यपदी त्यांची एकमताने फेरनिवड झाली आहे. एकूण ९३ मतदारांनी मतदान केले आणि सर्व ९३ मते नीता अंबानी यांच्या बाजूने म्हणजेच १०० टक्के झाली. नीता अंबानी २०१६ मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथमच आयओसी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत.
पुन्हा निवडून आल्यावर नीता अंबानी म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. मी अध्यक्ष बाख आणि आयओसी मधील माझ्या सर्व सहकार्यांचे माझ्यावरील भरोसा आणि विश्वासाबद्दल आभार मानू इच्छिते. ही पुनर्निवडणूक केवळ माझ्यासाठी एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दर्शविते . हा क्षण मी अतिशय आनंदाने आणि गर्वाने प्रत्येक भारतीयासोबत साजरा करू इच्छीते तसेच भारतात आणि जगभरात ऑलिम्पिक चळवळ मजबूत करण्यासाठी मी तत्पर असेल .
नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयओसी च्या वार्षिक बैठकीचे यजमानपद मिळाले आहे. २०२३ मध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊस बांधण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षकांसाठी जे भारतापासून दूर असलेल्या घरासारखे आहे.
Related
Articles
चीनमध्ये ८ बळी
09 Sep 2024
वक्फ बोर्ड विधेयकामागे राजकीय हेतु
09 Sep 2024
ऋषभ पंतचे शानदार अर्धशतक
08 Sep 2024
शेअर बाजार घसरला
12 Sep 2024
व्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी भारतामध्ये सामील व्हावे
09 Sep 2024
लष्करी अधिकार्यासह मैत्रिणींना मारहाण
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन