E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
नितीश कुमार आणि भाजपने बहुमत सिद्ध केले
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
तेजस्वी यादव यांना झटका
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत एनडीए सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि नितीश कुमार प्रणीत एनडीए सरकारने विश्वासप्रस्ताव जिंकला. विश्वासदर्शक ठरावावेळी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळे एनडीएने १२९ मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
त्या आधी विधानसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि १२५ मतांनी मंजूरही झाला. त्यानंतर चौधरी यांना अध्यक्षपद सोडावे लागले. यावेळी आरजेडीचे तीन आमदार नीलम देवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव हे एनडीए आघाडीच्या बाकावर जाऊन बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला चार मते अधिक पडल्याचे दिसले.
जदयूच्या आमदारांसाठी वाईट वाटते : तेजस्वी यादव
विधानसभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मला जदयूच्या आमदारांसाठी वाईट वाटते. ते आता पुढच्या निवडणुकीत जेव्हा जनतेसमोर जातील. तेव्हा त्यांना जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल. लोक म्हणतील नितीश कुमार यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होतात, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन का केले? दुसऱ्या बाजूला आम्ही जेव्हा जनतेमध्ये जाऊ तेव्हा १७ महिन्यांच्या काळात सरकारमध्ये काय काम केले, कसे रोजगार दिले, हे जनतेला सांगू.”
Related
Articles
बांगलादेशातील हिंदू नेत्यासह १७ जणांची बँक खाती गोठवली
29 Nov 2024
युक्रेनच्या शहरांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला
29 Nov 2024
राज कुंद्रा याला ईडीचे समन्स
02 Dec 2024
ग्लेन फिलिप्सने टिपला अफलातून झेल
30 Nov 2024
वाचक लिहितात
27 Nov 2024
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट
27 Nov 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शिक्षण क्षेत्र अनुल्लेखित
2
भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
3
तुरुंगात खितपत पडलेला निर्भीड पत्रकार!
4
सोरेन यांनाच पसंती (अग्रलेख)
5
थंडी वाढली; शेकोट्या पेटल्या
6
पराभवाचे खापर ‘ईव्हीएम्’वर (अग्रलेख)