इस्रायल रफाहमध्ये मोठ्या हल्ल्याच्या तयारीत   

1.5 दशलक्ष पॅलेस्टिनी भयभीत

 
रफाह : गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. इस्रायल गाझामधील रफाह येथे मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत ऱफाहमध्ये आसरा घेतलेल्या दीड लाख पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आश्रित लोकांची घरे इस्रायलच्या हल्ल्यात नष्ट झाली आहेत, ते आपला जीव वाचवण्यासाठी येथे राहत आहेत. इजिप्तला लागून असलेला हा भाग अजूनही सुरक्षित असून, इस्रायलने येथे बॉम्बफेक केलेला नाही. मात्र, आता येथेही लष्करी कारवाईची तयारी केली आहे. इस्रायलचा दावा आहे की, हमास दहशतवादी येथे लपले आहेत. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, इस्रायलला पॅलेस्टिनींना इजिप्तमध्ये ढकलायचे आहे. जेणेकरून ते जेरुसलेम आणि वेस्ट बँक प्रमाणे गाझा पूर्णपणे काबीज करू शकेल.
 
डॉ. नाहिद अबू अस्सी म्हणाले, नेतन्याहू आणि त्यांचे सरकार येथे रफाह हल्ला करण्याची धमकी देत आहेत. कुठे जावे? त्यांनी आम्हाला इजिप्तमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तिथे जाणार नाही. आम्ही गाझाला परत येऊ. गाझा ही आमची भूमी आहे. आम्ही येथे राहणे आणि मरणे पसंत करू, परंतु इजिप्त किंवा इतर कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित होणार नाही.
 
गाझाची लोकसंख्या 24 लाख आहे. त्यापैंकी अर्ध्याहून अधिक लोकांनी रफाहमध्ये आश्रय घेतला आहे. अशा स्थितीत इस्रायलने येथे लष्करी कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागू शकतो. अमेरिका आणि युरोपसह जगातील बहुतांश देशांनी इस्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे, मात्र इस्रायल रफाहमध्ये लष्करी कारवाई करण्यावर ठाम आहे. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 28 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
 

Related Articles