हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष कॅटालिन नोव्हाक यांचा राजीनामा   

बुडापेस्ट : हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष कॅटालिन नोव्हाक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॅटालिन यांनी बाल लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तीला माफी  केल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू झाली. त्यानंतर नोव्हाक यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
 
नोव्हाक म्हणाल्या, मी माफी मागते. मी एक चूक केली. बाललैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला माफ केले. यामुळे अनेकांना दु:ख झाले आहे. मी नेहमीच मुलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेच्या बाजूने होते आणि राहीन. 
 
एप्रिल 2023 मध्ये नोव्हाक यांनी बालगृहाचे माजी उपसंचालक आंद्रे के. यांना माफी  होती. त्याने आपल्या बॉसला मुलांवरील लैंगिक शोषण दडपण्यात मदत केली होती. तेव्हापासून अध्यक्षांना विरोध होता. हा विरोध 9 फेब्रुवारी 2024 रोजी वाढला. राष्ट्रपती भवनाबाहेर नागरिकांनी निदर्शने करत  नोव्हाक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 
 

कायदामंत्र्यांचाही राजीनामा  

 
नोव्हाक यांच्या राजीनाम्यानंतर हंगेरीचे कायदा मंत्री ज्युडिथ वर्गा यांनीही राजीनामा दिला. ज्युडिथ यांनीच दोषीला माफी मंजूर केली होती. मात्र, विरोधक अजूनही पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बेन यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
 

Related Articles