सुनेत्रा पवार यांच्या फलकावर बारामतीत शाईफेक   

बारामती, (वार्ताहर) : बारामती तालुक्यातील मौजे कार्‍हाटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर अनोळखी व्यक्तींनी शाईफेक केल्याची घटना बारामतीत घडली आहे.
 
सुनेत्रा पवार यांच्या फोटोचा, तसेच भावी खासदार अशा आशयाचा एक बॅनर कार्‍हाटी या गावात लावण्यात आला होता. त्या फलकावर अनोळखी व्यक्तीने शाई टाकली आहे. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.  
 
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौर्‍यावर होत्या. या घटनेबाबत त्या म्हणाल्या की, या घटनेची चौकशी झाली पाहिजे. शाई फेकणे कृत्य अतिशय चुकीचे आहे. 

Related Articles