माजी आमदार वल्‍लभ बेनके यांचे निधन   

पुणे : जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४  वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पूत्र आमदार अतुल, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (ता.12) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बेनके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.

Related Articles