E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
सिलिंडरच्या स्फोटामुळे हॉटेलला आग
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
पुणे : बिर्याणीच्या हॉटेलमधील भटारखान्यातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग भडकली आणि शेजारच्या दोन दुकानांना देखील आग लागली. हडपसर येथील सातववाडी परिसरात असलेल्या साईनगर सोसायटीमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या घटनेत जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी सांगितले.
हडपसर, सातववाडी, साईनगर सोसायटी येथे असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानंतर, दलाकडून काळे बोराटे नगर व हडपसर अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
तळमजला अधिक दोन मजली इमारतीत तळमजल्यावर असणार्या भन्नाट बिर्याणी हाऊसमध्ये आग लागली होती. तसेच वर दोन मजल्यावर सदनिकेत काही रहिवासी असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिले. त्याचवेळी तातडीने जवानांनी 3 पुरुष व 3 महिला यांना सुरक्षित ठिकाणी नेत बिर्याणी हाऊसचे शटर उघडून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दलाची मदत पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवानांनी घटनास्थळावरून तीन सिलिंडर बाहेर काढले, तर एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणत जवानांनी थंडावा निर्माण करण्यासाठी पाण्याचा फवारा सुरूच ठेवला. आगीमध्ये बिर्याणी हाऊसमधील सर्व वस्तूंचे पूर्ण नुकसान झाले असून, शेजारी असलेल्या इतर दोन दुकानांना आगीची झळ बसली आहे.
अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड, तसेच वाहनचालक राजू शेख, नारायण जगताप व फायरमन अनिमिष कोंडगेकर, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, केतन घाडगे, संकेत शिंदे, डगळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Related
Articles
बुलडाण्यातील रहिवाशांना पडत आहे टक्कल!
09 Jan 2025
हनुमान टेकडीवर तरुणीला लुटणारे चोरटे गजाआड
09 Jan 2025
नवा संघर्ष (अग्रलेख)
07 Jan 2025
अमेरिकेच्या दक्षिण भागात वादळी वारे, हिमवर्षाव
11 Jan 2025
भारतीय संघाची चॅम्पियन्स चषकासाठी लवकरच घोषणा
08 Jan 2025
आठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात हजेरी लावा : मुख्यमंत्री
08 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)