E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
ऑस्ट्रेलियासमोर भारतीय युवकांची शरणागती
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
बेनोनी : एकोणिस वर्षाखालील विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 फलंदाज गमावून 253 धावा केल्या. मात्र भारताच्या युवा संघाला हे माफक आव्हान पार करता आले नाही. त्यामुळे भारताला 79 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आणि विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाने उंचावला. भारतीय संघाची विजेतेपद मिळविण्याची संधी हुकली.
ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार ह्यूने 48 धावांची शानदार खेळी केली. हॅरी डिक्सनने 42 धावा केल्या. भारतासाठी राज लिंबानीने 10 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. नमन तिवारीने 2 बळी घेतले. सौम्या पांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाने दिलेले माफक आव्हान भारतीय फलंदाजांना पेलता आले नाही. भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
ऑस्ट्रेलियन संघाच्या सॅम कॉन्स्टासचा बळी स्वस्तात गमावला. कॉन्स्टन्स खाते न उघडता राज लिंबानीचा बळी ठरला. यानंतर कर्णधार ह्यू वेग्बेन आणि हॅरी डिक्सन यांनी 78 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. नमन तिवारीने या दोन्ही खेळाडूंना बाद केले. ऑस्ट्रेलियाने 99 धावांमध्ये तीन बळी गमावल्या होत्या, तेथून हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी मिळून 66 धावा जोडल्या. हिक्सला वेगवान गोलंदाज राज लिंबानीने बाद केले. तर हरजस सिंग फिरकीपटू सौम्य पांडेचा बळी ठरला.
राफे मॅकमिलन देखील काही विशेष करू शकला नाही आणि त्याच्या जागी मुशीर खान आला. येथून ऑलिव्हर पीकने नाबाद 46 धावा करत ऑस्ट्रेलियाला 250 च्या पुढे नेले. भारताने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने टॉम कॅम्पबेलच्या जागी चार्ली अँडरसनला संधी दिली होती.याआधी भारताने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 2 बळीने पराभव केला होता. तर दुसर्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत दोनदा भिडले होते. दोन्ही वेळा भारतीय संघाने शानदार पद्धतीने विजय मिळवला. मात्र तिसर्यांदा अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये झालेला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. याआधी भारतीय संघाने 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. भारतीय संघ हा 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी होता. मात्र ऑस्ट्रेलियाने काल बाजी मारली. भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विश्वचषकावर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला होता. संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया : हॅरी डिक्सन 42, सॅम कोन्स्टास 0, ह्यू वॅबगेन 48, हरजस सिंग 55, रायन हिक्स 20, ऑलिव्हर पीक 46, राफे मॅकमिलन 2, चार्ली अँडरसन 13, टॉम स्ट्रेकर 8, एकूण 50 षटकांत 253/7
भारत : आदर्श सिंग 47, अर्शिन कुलकर्णी 3, मुशीर खान 22, उदय सहारन 8, प्रियांशू मोलिया 9, सचिन धस 9, अरावेली अवनीश 0, मुरुगन अभिषेक 42, एकूण 43.5 षटकांत 174/10
संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या हरजास सिंगचे अर्धशतक
भारताने प्रथम फलंदाजी करणार्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध ठराविक अंतराने बळी घेतल्या. मात्र मधल्या फळीतील फलंदाज हरजास सिंगने अर्धशतक ठोकत भारतावरचा तणाव वाढवला. त्यानंतर भारताला 254 धावांचे आव्हान पार करावे लागणार होते. 19 वर्षाखालील विश्वचषकामधील धावांचा पाठलाग करताना ही सर्वात मोठी धावसंख्या होती. भारताने जर ही धावसंख्या पार केली असती तर तो इतिहास घडला असता. मात्र भारतीय संघ अपयशी ठरला. यापूर्वी 1998 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्ध 242 धावांचे लक्ष्य पार केले होते. हरजास सिंग हा संपूर्ण स्पर्धेत अपयशी होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत 39 धावा केल्या होत्या. मात्र अंतिम सामन्यामध्ये त्याने 55 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर पिकने नाबाद 46 धावा करत शेवटच्या 10 षटकात संघाला 66 धावा जोडून दिल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 बळी घेतल्या तर नयन तिवारीने 3 बळी घेत चांगली साथ दिली.
Related
Articles
पुन्हा फडणवीस (अग्रलेख)
05 Dec 2024
रोहित शर्मा सलामीला नाही?
03 Dec 2024
श्रद्धा आणि पर्यावरणवादाचा मेळ
06 Dec 2024
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी आणखी चार वर्षे!
03 Dec 2024
मुसळधार पावसामुळे म्हैसूरमधील शाळांना सुट्टी
02 Dec 2024
समाज माध्यमांपासून मुलांना वाचवण्यासाठी...
08 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
पुण्यातील थंडी गायब