E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
गुलाब फुलला
गुलाब फुलला देहावरी,
की देह उमलला गुलाबापरी ॥1॥
काया झाली गोरिमोरी
रातराणी आज बहरली ॥2॥
काय असे हे अघटित घडले,
कलिकेचे सुंदर फुल जाहले ॥3॥
सहजच तू अलवार पाहिले
लाजेने मी आरक्त जाहले ॥4॥
गालावरील लाली लाजली
खळीआड का लपून बसली ॥5॥
स्पर्श तुझे ते डोळ्यामधले
नकळतच मी किती शहारले ॥6॥
प्रेम जागले हृदया मधले
देहामध्ये अलगद उलगडले ॥7॥
प्रेम प्रेम ते हेच असते
आज अजाणता मी जाणले ..... ॥8॥
- सुजाता दरेकर
मो.नं.9890591827
---------------------------------
होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...
औषधाच्या बाटलीतून 4 गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या 6 गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा 2 गोळ्या परत टाकायला गेलो तर 4 गोळ्या बाटलीत परत जातात...
या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...
खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...
कारण, थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.
नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं. याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात.
विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...
1. बायको गोरी असेल तर.. सन स्क्रिन
आणि
2. काळी असेल तर... फेअर लव्हली
असं म्हणतात की, जो हसला, त्याचं घर वसलं !!
पण .........
ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......
की तो मग केव्हा हसला?
--
श्री गणराज
जाग येताऽ रोज प्रभाती
नयना पुढती मुदीत मूर्ती
साकारे तव सगुण भक्ती
श्री गणराज माझी स्फूर्ती...
ध्यान मंदिरी वक्र तुंडता
सदा कृपाळूबा एकदंता
वरदाने लाभे नंद प्रचिती
श्री गणराज माझी स्फूर्ती...
आश्वस्त कृतीचा तूच धनी
ऋतसत्याचा मात्र कारणी
मुळारंभ, तव दिगंत कीर्ती
श्री गणराज माझी स्फूर्ती...
अवकाशी नांदशी निर्गुण
मिश्किल रविशशी लोचन
ज्ञानविज्ञान साक्षी प्रगती
श्री गणराज माझी स्फूर्ती...
दाटून येता सांज व्याकुळ
नेत्र अश्रू वाहती घळाघळ
ओंकार स्वरूप मनशक्ती
श्री गणराज माझी स्फूर्ती...
नितनित स्मरणात रमावे
नृत्य गायनी धुंद असावे
नच राहील, उणे मजप्रति
श्री गणराज माझी स्फूर्ती...
- कविता मेहेंदळे
93266 57027
---
ट्रेनच्या आतल्या गर्दीच्या ’चक्रव्यूहाला भेदण्याचं जे कौशल्य’ या नमकीन अथवा शहाळी विकणार्यांपाशी असतं ते तर ’अभिमन्यु’ पाशीही नव्हतं.
माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.
आई शप्पथ सांगतो की
त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.
अजून पर्यंत हे समजलं नाही की
जघ च्या ऐवजी घ आणि ॠजजऊ चजठछखछॠ च्या ऐवजी ॠच लिहिणारे, आयुष्याचे 2 सेकंद वाचवून काय करत असतील?
आणि ..... ह्या हााा ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे,
असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय !
आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात. पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.
आणि दूसरी म्हणजे तो पिणारा-खाणारा नसावा.
हे कसं काय बुवा?
गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.
आणि चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं.
जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे.
--
एका कोर्टात खटला चालू होता.
अत्रेंनी एका सन्माननीय खासदाराला गाढव म्हटले होते.
न्यायमूर्तींनी अत्रेंनी परत असे न करण्याबद्दल बजावले आणि पहिलाच गुन्हा आहे म्हणून शिक्षा न देता सोडून दिले.
आरोपीच्या पिंजर्यातून बाहेर पडण्याआधी अत्रे म्हणाले,
न्यायमूर्ती महाराज, खासदाराला मी गाढव म्हटलं, ही माझी चूक झाली. पण जर मी एखाद्या गाढवाला खासदार म्हटलं तर ती माझी चूक असेल का.? न्यायमूर्ती म्हणाले की अत्रे आपण गाढवाला काहीही म्हणू शकतो. अत्रे खासदारासमोर जाऊन म्हणाले नमस्कार खासदार साहेब...!
---
Related
Articles
ब्रिटिशांकडून भारताची लूट
05 Feb 2025
पाकिस्तानातही भरला कुंभमेळा...
02 Feb 2025
महाविद्यालय, दोन शाळांमध्ये बॉम्बची धमकी
08 Feb 2025
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
05 Feb 2025
स्वप्नील कुसाळे, राही-प्रवीण यांना कांस्यपदक
07 Feb 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना; आयआयटींचा विकास
02 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
6
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक