कॅलिफोर्नियात हेलिकॉप्टर दुर्घटनेत ६ ठार   

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दक्षिण कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नायजेरियाच्या ऍक्सेस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यासह सहा जणांचा मृत्यू झाला. 
 
ऍक्सेस बँक ही नायजेरियातील प्रमुख बँक आहे. या बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हर्बर्ट विग्वे (57), विग्वे यांची पत्नी, मुलगा तसेच नायजेरियन स्टॉक एक्सचेंज ‘एनजीएक्स ग्रुप’चे माजी अध्यक्ष बामोफिन अबिंबोला ओगुनबांजो यांच्यासह सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला. 
 
नायजेरियाचे माजी अर्थमंत्री एनगोजी अकोन्जो-इवेला यांनी मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातात हर्बर्ट विग्वे, त्यांची पत्नी आणि मुलगा तसेच ओगुनबॅन्जो यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला दु:ख झाले आहे. विग्वे यांच्या निधनामुळे नायजेरिया च्या बँकींग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.  

Related Articles