गुलमर्गमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ   

गुलमर्ग : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या हिमवृष्टीमुळे ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीरचे गुलमर्ग निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. देश-विदेशातील शेकडो पर्यटक कुटुंबासह बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी गुलमर्गमध्ये दाखल होत आहेत.
 
कडाक्याच्या थंडीत बर्फवृष्टी न झाल्याने लोकांची निराशा झाली होती. लोक हिमवृष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून, बर्फाळ उतारांवर स्किइंग करण्यासाठी आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या प्रसन्न दर्‍या आणि नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी दूर-दूरवरून पर्यटक गुलमर्गकडे येत आहेत.
 
पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार, या बर्फवृष्टीनंतर फेब्रुवारीच्या अवघ्या सहा दिवसांत 19 हजार 532 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. 1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान 15 हजार 086 देशी पर्यटक, 4 हजार 290 स्थानिक आणि 156 परदेशी पर्यटक गुलमर्गला आले आहेत.
 

Related Articles