अकाली दल-भाजपमध्ये युतीची चर्चा निष्फळ   

चंदीगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपमध्ये झालेली युतीची चर्चा निष्फळ ठरली.भाजप पंजाबमधील लोकसभेच्या 13 पैकी 6 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करत आहे. अकाली दल जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा तो 10 जागांवर निवडणूक लढवत होता आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत होती. त्यामुऴे तर अकाली दल भाजपला आता 6 जागा देण्यास तयार नाही.  तसेच पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या बाजूने नसल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा फिस्कटली. 
 
केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी नवे कृषी कायदे आणले होते, तेव्हा अकाली दलाने त्याचा विरोध करत एनडीएतून बाहेर पडले होते. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत युती करून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली.पंजाबमध्ये बसपचा चांगला प्रभाव असल्याने त्यांनी अकाली दलाला युती तोडायची नसल्याचेही सांगण्यात येते. सुखदेव सिंह धिंडसा यांचा गटही अकाली दलात सामील झाल्याची चर्चा आहे.
 

Related Articles