आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हाकालपट्टी   

नवी दिल्ली : पक्षविरोधी भाष्य करणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.कृष्णम यांच्याविरोधातील बेशिस्तीचे आरोप आणि जाहीरपणे पक्षाविरोधात केली जाणारी वक्तव्य पाहाता काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य केली. कृष्णम यांनी 2019 मध्ये  लखनौच्या जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते वारंवार काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसच्या धोरणांविरोधात भूमिका घेत होते. पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी आल्याने त्यांनी  कृष्णम यांची हाकालपट्टी केली. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन  कृष्णम यांनी भाजपचे कौतुक केले होते. पक्षाची भूमिका डावलून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला देखील हजर राहिले होते. 

Related Articles