जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार   

जळगाव : येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. वैद्यकीयसाठी तर कोटी  रुपये लागतात. यामुळे सामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती. त्यांच्या आता शिक्षणाची दारे उघडणार आहेत. 
 

मुलांना का नाही ? 

 
याच बरोबर चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत करावे अशी मागणी केली. यावेळी पाटील यांनी तुमची ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन दिले. 
 

Related Articles