ससून रुग्णालयातून आणखी एक आरोपी पसार   

पुणे : कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांना धमकी दिल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मार्शल लुईस लीलाधर असे पसार झालेल्यांचे नाव आहे.मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोहोळची पत्नी स्वाती हिला समाज माध्यमातून धमकी देण्यात आली होती. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती. त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत बरी नसल्याने ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र मार्शल बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पूर्वी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससूनमधून पसार झाल्याची घटना घडली होती.

Related Articles