पीएफवर मिळणार आता जादा व्याज   

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर 2023-24 साठी 8.25 टक्के व्याजदर निश्‍चित केला आहे. तीन वर्षांतील हा सर्वाधिक व्याजदर आहे.
 
याआधी, मार्च 2023 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2022-23 साठी पीएफचा व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला होता. त्याआधी, मार्च 2022 मध्ये 2021-22 साठी हा व्याजदर 8.5 वरून 8.1 टक्के केला होता. हा दर चार दशकांतील नीचांकी होता. 1977-78 मध्ये पीएफवर 8 टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्‍वस्त मंडळाची (सीबीटी) 235 वी बैठक पार पडली. या बैठकीत 2023-24 साठी व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
 

व्याज दराचा आलेख

 
2011-12 : 8.25 टक्के
2012-13 : 8.50 टक्के
2013-14 : 8.75 टक्के
2014-15 : 8.75 टक्के
2015-16 : 8.80 टक्के
2016-17 : 8.65 टक्के
2017-18 : 8.55 टक्के
2018-19 : 8.65 टक्के
2019-20 : 8.05 टक्के
2020-21 : 8.05 टक्के
2021-22 : 8.01 टक्के
2022-23 : 8.15 टक्के
2023-24 : 8.25 टक्के
 

Related Articles