जेएनयूत विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी   

अभाविप - डीएसएफचे सदस्य जखमी

 
नवी दिल्‍ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या गटात शनिवारी रात्री उशिरा हाणामारी झाली.  विद्यपीठाअंतर्गत होणार्‍या निवडणुकीसाठी सदस्यांची निवड करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. त्या बैठकीत हा प्रकार घडला.
 
विद्यार्थी संघटनांची विद्यापीठातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक आयोजित केली होती. तेव्हा या दोन संघटनांतील विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली.  त्यात दोन्ही बाजूचे सदस्यही जखमी झाले आहेत. त्यांनी हाणामारीला त्यांनी एकमेकांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणीं विद्यापीठाच्या प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
विद्यापीठाच्या आवारातील साबरमती धाबा निवडणूक आयोगाचे सदस्य निवडण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. डाव्या विचारसणीच्या डेमोक्रॅटीक स्टुंडंट फेडरेशनने (डीएसएफ) आरोप केला की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तसेच व्यासपीठावर चढून सभापती आणि अन्य जणांना खोचक प्रश्‍न विचारण्यास सुरवात केली. या संदर्भातील चित्रफिती समाज माध्यमांवर दोन्ही बाजूंनी पुरावे म्हणून टाकल्या आहेत. त्यात संघटनाचे सदस्य एकमेकाशी वाद आणि घोषणाबाजी करत असल्याचे दिसले. सुरक्षारक्षक त्यांना रोखत होते. 
 
जेएनयूच्या प्रशासनाने निवडणुकीची घोषणा केली. तसेच या संदर्भात निवडणूक समिती स्थापन करण्यासाठी आयोजित बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न अभाविपने केला, असा आरोप डीएसएफने केला आहे. जेएनयूएसच्या अध्यक्षा ऐशी घोष यांच्यावर चक्‍क पाणी फेकले. त्यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रकार निंदनीय असून खपवून घेतला जाणार नाही. जेएनयूच्या अभाविपचे सरचिटणीस विकास पाटील यांनी आरोप केला की, डीएसएफच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्‍ला केला. प्रशांत बागचीवर हल्‍ला केला. एमएच्या अंतिम वर्षात शिकणार्‍या प्रफुल्‍लावर धारदार हत्याराने हल्‍ला केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले.  संघटनेला पाठिंबा देणार्‍या बी. ए. पर्शियन, दिव्यप्रकाश यांना देखील डाव्या संघटनांच्या सदस्यांनी मारहाण केली. 
 

Related Articles