पंजाबमध्ये ‘आप’ लवकरच उमेदवार जाहीर करणार   

केजरीवाल यांची घोषणा

 
खन्ना, (पंजाब) : पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी आणि चंडीगढच्या एका जागेसाठी पंधरा दिवसांत उमेदवार जाहीर केले जातील, अशी घोषणा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केली.
 
पंजाब सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरभरून आशीर्वाद दिलात. त्यामुळे विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा ‘आप’ने जिंकल्या. तुम्ही पंजाबमध्ये इतिहास घडवला. मला पुन्हा एकदा आशीर्वाद हवा आहे. 
 
पंजाबमधील 13 आणि चंडीगढमधील एका जागेसाठी पंधरा दिवसांत उमेदवार जाहीर केले जातील. या सर्व जागांवर ‘आप’च्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले.
 
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोन वर्षांत खूप कामे केली आहेत, अशा शब्दांत केजरीवाल यांनी त्यांची प्रशंसा केली.काँग्रेसने केलेले एक तर चांगले काम सांगा. पण, तुम्हाला ते आठवणार नाही; कारण त्यांनी काही कामेच केली नाहीत. अकाली दलाने इतकी वर्षे राज्य केले, त्यांनी तरी एखादे चांगले काम सांगावे, असेही केजरीवाल म्हणाले.
 

Related Articles