सोळू घटनेत चौथा मृत्यू; नंदा शेळके यांचे निधन   

आळंदी (वार्ताहर) : येथील सोळू गावात अ‍ॅल्युमिनियम प्लेट बनवणार्‍या कंपनीत गुरुवारी (दि. 8)  भीषण स्फोट होऊन दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. आता चौथा मृत्यू एका महिलेचा झाला आहे. अनेक जखमींवर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
या घटनेत यापूर्वी रामचंद्र निंबाळकर, संतोष माने (रा. सोळू), आणि नवनाथ पांचाळ अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. आता नंदा संतोष शेळके या सोळू येथील स्फोटामध्ये जखमी झाल्या होत्या. त्या सोळूमध्ये भाजी आणण्यास गेल्या होत्या. त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा अंत्यविधी पिंपळगाव तर्फे चाकण येथील वडगाव शिंदे, पुलाशेजारील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात इंद्रायणी तीरावर करण्यात आला.  या स्फोटाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. 

Related Articles