रासायनिक हल्‍ला करणार्‍याचा मृतदेह थेम्स नदीत आढळला   

लंडन : ब्रिटनच्या मॅनहटन येथे  जानेवारीत रासायनिक हल्‍ला झाला होता. त्या प्रकरणातील संशयित अब्दुल इझेदी याचा मृतदेह लंडन येथील थेम्स नदीत आढळला आहे. या संदर्भातील महिती शुक्रवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी दिली. 
 
रासायनिक हल्‍ला ३१ जानेवारी रोजी झाला होता. त्यात एक महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्‍लेखोराचा शोध घेतला होता. चेल्सा पुलाजवळ तो दिसला होता. त्यानंतर आणखी चित्रफिती त्यांनी गोळा केल्या होत्या. या प्रकरणातील हल्‍लेखोर इझेदी होता, असे स्पष्ट झाले होते. त्याचा मृतदेह थेम्स नदीच्या चेल्सा पुलाजवळ आढळून आला आहे. घटनेपूर्वी तो चार ठिकाणी फिरला होता. यानंतर त्याने नदीत प्रवेश केल्याचे आढळले होते. हल्ल्यात तोही भाजला होता. दाह कमी करण्यासाठी त्याने नदीत प्रवेश केला असावा, तेथेच त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles