पाकिस्तानात गोळीबारात तीन दहशतवादी ठार   

पेशावरमध्ये पोलिसांच्या वाहनावर हल्‍ला 

 
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी हल्‍ला झाला आहे. त्यात पोलिस अधिकारी आणि तीन दहशतवादी ठार झाले आहेत. 
पोलिसांच्या एका वाहनावर दक्षिण वझिरीस्तान परिसरात दहशतवाद्यांनी हल्‍ला केला होता. तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळींबार झाला होता. वाहन नियमित गस्तीवर होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या. सुमारे एक तास गोळीबार सुरू होता. तीन दहशतवादी ठार झाले आहेत. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा रवाना केला आहे. तेथील परिसराची नाकेबंदी केली आहे. तसेच परिसरात लपून बसलेल्या अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविली आहे. 

Related Articles