बुलेटचे ५७१ कर्णकर्कश सायलेन्स पोलिसांकडून जप्त   

पुणे : बुलेटच्या सायलेन्सच्या मदतीने फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज काढून ध्वनीप्रदुषण करणार्‍या वाहनचालांवर वाहतुक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. बुलेटला कर्णकर्कश सायलेन्सर लावून ध्वनीप्रदुषण करणार्‍या 571 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी या वाहनचालकांवर कारवाई करून या सर्व 571 बुलेटचे सायलेन्सर जप्त केले आहेत. विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विद्यापीठ, तसेच हडपसर वाहतूक विभांतर्गत सर्वाधिक कारवाया केल्या आहेत.
 
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अशा फेरबदल केलेल्या सायलेन्सर लावलेल्या बुलेट चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
नागरिकांना अशा वाहन चलकांची तक्रार करता यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी 8087240400 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक कार्यान्वीत केला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर तक्रार करावी अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
 
जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरवर पुणे वाहतूक पोलिसांनी बुलडोजर फिरवला असून सायलेन्सरचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बुलेटच्या सायलेन्सरच्या मदतीने ध्वनीप्रदुषण करणार्‍यांवर चाप बसणार आहे. 
 

Related Articles