३५ व्या पश्‍चिम विभाग जपानी भाषा वक्‍तृत्व स्पर्धेत टिमविच्या विद्यार्थ्यांचे यश   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जपानी भाषा विभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी 35 व्या वेस्ट झोन जपानी भाषा वक्‍तृत्व स्पर्धेत पारितोषिक पटकाविले.मोसाई आणि इंडो जॅपनीज असोसिएशनतर्फे 35 वी वेस्ट झोन जपानी भाषा वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जपानी भाषा विभागातील बीए प्रथम वर्षातील विद्यार्थिनी  कनिष्ठ गटातून आलाया अवधारे द्वितीय, वरिष्ठ गटातून इशिता चाफेकर व तानिया राऊळ यांना अनुक्रमे तिसरे व उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. व्हाईस कॉन्सुलेट जनरल हामुरो मेगुमि यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जॅपनीज असोसिएशन, पुणेचे उपाध्यक्ष मिसाकी योशिओको, जपान फाऊंडेशनचे वेस्ट झोनचे भाषा तज्ज्ञ आणि सल्‍लागार तोमोनारी कुरोदा, बाँबे जॅपनीज स्कूलचे उपमुख्याध्यापक देगुची हिदेओ, शिक्षिका नागाता हारुका, मुख्याध्यापक येशिरो सातो यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणावर आधारित त्यांना प्रश्‍न विचारण्यात आले होते.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक व कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles