भारतीय आयटी अधिकार्‍याचा प्राणघातक हल्ल्यानंतर मृत्यू   

अमेरिकेतील घटना

 
वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आयटी अधिकार्‍याचा प्राणघातक हल्ल्यानंतर मृत्यू झाला आहे. राजधानी वॉशिंग्टन येथील रेस्टॉरंटबाहेर 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर हल्‍ला झाला होता. त्यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यामुळे प्राणघातक हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या आता १७ झाली आहे.
 
विवेक तनेजा, यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन याचे निवासस्थान व्हाइट हाऊसपासून काही अंतरावर असलेल्या १५ रस्ता परिसरातील रेस्टॉरंट बाहेर विवेक यांच्यावर प्राणघातक हल्‍ला झाला होता. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आहे.सीसीटीव्हीत हल्ल्याची दृश्ये कैद झाली आहेत. हल्‍लेखोराचे छायाचित्र पोलिसांनी सार्वत्रिक केले असून त्याला पकडून देणार्‍यास २५ हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की, डायनमो टेक्नालॉजीचे सह संस्थापक आणि अध्यक्ष असलेले तनेजा एका जपानी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्याच्या बाहेर एका  हल्‍लेखोराने तनेजा यांना जमिनीवर आपटले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 
 

Related Articles